नगर- नगर-पुणे रोडवरील अकोळनेर येथील कोलन मार्ट कंपनीच्या शुभारंभाप्रसंगी नगर शहरातील स्नेहालयाचे सुवालाल शिंगवी, सामाजिक कार्यकर्त्...
नगर- नगर-पुणे रोडवरील अकोळनेर येथील कोलन मार्ट कंपनीच्या शुभारंभाप्रसंगी नगर शहरातील स्नेहालयाचे सुवालाल शिंगवी, सामाजिक कार्यकर्त्या रत्ना यशवंते, सीएसआरडीई कॉलेजचे प्रा.सॅम्युअल वाघमारे, संपदा ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध मिरेकर आदि उपस्थित होते.
प्रारंभी कोलन मार्ट कंपनीचे संस्थापक सुमन कुमार यावेळी बोलताना म्हणाले की, मी बिहार येथील अतिदुर्गम भागातील शेतकरी कुटूंबातील असून, शेतकर्याच्या समस्या या त्याच्या बालपाणापासूनच जवळून पाहिल्या आहेत, त्यामुळे मी ग्रामीण क्षेत्रात शेती विषयावर काम करण्याचा निर्णय लहानपणीच घेतला. सध्या मी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स येथे शिक्षण घेत आहे. कंपनीबाबत माहिती देतांना सांगितले की, देशात सेंद्रीय शेतीला उत्तेजना मिळावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य बाजारभाव मिळावा, याशिवाय ग्राहकांपर्यंत सेंद्रीय फळे आणि भाज्या या योग्य दरात घरपोहच सेवेच्या माध्यमातून देण्यात याव्यात, हा मुख्य उद्देश असून, सध्याची परिस्थिती पाहता नगर शहरातील या कॉलन मार्टची सेवा सुरु करण्यात आली आहे. 2017 पर्यंत देशातील 10 शहरात ही सेवा सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगून सुमन कुमार यांनी सेंद्रीय व स्वास्थ्यवर्धक प्रवासात आपल्या सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमास वांबोरी, केडगांव, सोनेवाडी व परिसारातील शेतकरी व राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









