प्रतिनिधी - पोलिसांच्या हप्तेखोरपणामूळे राहुरी तालूक्याची कायदा व सुव्यवस्था मोडकळीला आली असून राहुरी पोलिस ठाण्याची स्थापना होऊन 80 व...
प्रतिनिधी - पोलिसांच्या हप्तेखोरपणामूळे राहुरी तालूक्याची कायदा व सुव्यवस्था मोडकळीला आली असून राहुरी पोलिस ठाण्याची स्थापना होऊन 80 वर्षे झाली, या 80 वर्षात पहील्यांदाच पोलिस प्रशासनाच्या कारभारा विरोधात मोर्चा काढण्याची वेळ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्यामूळे राहुरीच्या जनतेवर आली असल्याची खंत मा. खा. बापूसाहेब तनपूरे यांनी पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी व्यक्त केली.
राहुरी तालूक्याचा कायदा व सुव्यवस्था पूर्ण पणे कोलमडली असून दारू, जूगार, मटका, वेश्या व्यवसाय, वाळू तस्करी, महीलांची छेडछाड, गावठी कट्टे बाळगणे, मोटरसायकल चोरी, दरोडे आदिं व्यवसायांचे राहुरी हे जिल्ह्यातील केंद्र स्थान बनत आहे. आदिं कारणाने दिनांक 9 मार्च 2016 रोजी सकाळी 10 वाजता मा. खा. बापूसाहेब तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील सर्व पक्षीय संघटना, वकील असोसिएशन, डाॅक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन व सामान्य नागरिक यांनी मिळून राहुरी पोलिस ठाण्यावर महामोर्चा काढून पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
नगर मनमाड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून तालूक्यातील महीलांसह सुमारे चार ते पाच हजार नागरीकांनी एकत्र येऊन मोर्चाला सुरूवात केली. यावेळी शहरातील व्यापार्यांनी 100 टक्के बंद पाळला तर राहुरी न्यायालयातील वकील असोसिएशनने दुपारी दोन वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद ठेऊन मोर्चात आपला सहभाग नोंदविला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपूरे, नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपूरे, युवानेते प्राजक्त तनपूरे, पंडूतात्या पवार, आर. आर. तनपूरे, सुरेश बाफना, ईस्माईल सय्यद, राजेंद्र बोरकर, अरूण ठोकळे, डॉ. संजय भळगट, सौ. सोनाली उदावंत, सौ. अर्चना तनपूरे, सौ. विद्या करपे, श्रीमती अर्चना खामकर आदिंसह तालूक्यातील नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.










