संकलेच्या गोलंदाजीवर भालेरावचे सलग 5 चौकार नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने आयोजित अ...
संकलेच्या गोलंदाजीवर भालेरावचे सलग 5 चौकार
नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने आयोजित अहमदनगर प्रिमियर लिग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत इशवेद वॉरियर्स व क्वेरा चॅलेंजर्स यांच्यात व साईदिप हिरोज चा संघ विजेता ठरला. अनुपम संकलेचा यांच्या गोलंदाजीवर महेंद्र भालेराव याने सलग 5 चौकार फटकावले.
इशवेद वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 20 षटकांत त्यांनी 8 बाद 149 धावांचे आव्हान क्वेरा चॅलेंजर्सने 16.3 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. क्वेरा चॅलेंजर्स समोर ठेवले. क्वेरा चॅलेंजर्सने 16.3 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. 8 गडी राखून त्यांनी विजय मिळवला.
इशवेदच्या मोहसीन सैफ याने 47 चेंडूत 60 धावा, सौरभ शिंगवीने 37 धावा, सचिन धायगुडेने 26 धावा केल्या. क्वेरा चॅलेंजर्सच्या महेंद्र भालेरावने 53 चेंडूत नाबाद 84 धावा ठोकल्या. यश कासलीवलाने 34, श्रीपाद निंबाळकरने नाबाद 14 धावा केल्या. क्वेरा चॅलेंजर्सना महेंद्र भालेराव मॅन ऑप द मॅचचा मानकरी ठरला.
साईदीप हिरोज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करीत 20 षटकांत 7 बाद 168 धावांचे आव्हान न्यू ऐरा कमांडोज समोर ठेवले. त्यांनी 20 षटकांत 8 बाद 134 धावा केल्या. या स्पर्धेत साईदीप हिरोजने 34 धावांनी सामना जिंकला. साईदिपच्या सिध्दार्थ भगतने 31 चेंडूंत 57 धावा, नासारी कुरेशी याने 28 धावा, अभिजीत दुधेने 24 धावा, राजू यादव याने नाबाद 20 धावा केल्या. न्यू ऐरा चॅलेंजर्सच्या संदीप आडोळे याने 10 चेंडूत 25 केल्या. महेश पवारने 24, शुभम मोरेने 18 धावा केल्या. साईदीपच्या सिध्दार्थ भगतने 57 धावा करीत 1 गडी बाद केला. त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी व नगरसेवक विपुल शेटिया यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला. इशवेदचे मालक संदीप बोरा, क्वेरा चँलेंजर्सचे राहुल धापटकर, साईदीपचे नीलेश चोपडा, न्यू ऐराचे मालक परेश दिवाणी, राहुल मुथियान आदी उपस्थित होते.










