नगर- येथील विळद घाटातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी कु.अपेक्षा काणकिया ही नुकत्याच जाहीर झालेल्या ...
नगर- येथील विळद घाटातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी कु.अपेक्षा काणकिया ही नुकत्याच जाहीर झालेल्या एम.बी.बी.एस. परिक्षेत 75 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. कु. अपेक्षा ही नगर येथील प्रतितयश चार्टर्ड अकौटंट मुकेश काणकिया यांची कन्या व मे.सतिषचंद्र अनंतरायचे बाबुभाई काणकिया यांची नात आहे.
इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑउ इंडिया तर्फे डिसेंबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या सी.एस. फायनल प्रोफेशनल) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 3.31 टक्के आहे. या परिक्षेत दिलीप गांधी आणि ऍड.गिरीजा गांधी यांची कन्या कु.सुप्रिया गांधी उत्तीर्ण झाली आहे तर कु.अपेक्षा ही अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल व पेमराज सारडा महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे











