नेवासा - नेवासा शहराच्या विकासासाठी आपण मास्टर प्लान तयार करणार असून त्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.नेवासा शहराच्या विकासासाठी...
नेवासा - नेवासा शहराच्या विकासासाठी आपण मास्टर प्लान तयार करणार असून त्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे.नेवासा शहराच्या विकासासाठी राखीव निधीची तरतुद केली असून यासाठी सर्वांनी एकत्र बसून नियोजन करावे असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
नेवासा येथील पोस्ट ऑफिस रोड ते श्रीरामपुर रोड या काँक्रीटिकरण झालेल्या रस्त्याचा शुभारंभ आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शनिवारी करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते रामभाऊ जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, जेष्ठ व्यापारी अशोक गुगळे, रम्हु शेठ पठाण, डौले, सुरेश नळकांडे यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांचे स्वागत सुधीर चव्हाण केले. तर कृष्णाजी डहाळे यांनी प्रास्ताविक केले.










