अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर रविवारी दि.06 मार्च 2016 रोजी सकाळी मा.रिपब्लीकन चळवळीतील नेते मा.अशोकराव गायकवाड यांची वडील रामचंद्र गायकवाड...
अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर रविवारी दि.06 मार्च 2016 रोजी सकाळी मा.रिपब्लीकन चळवळीतील नेते मा.अशोकराव गायकवाड यांची वडील रामचंद्र गायकवाड यांच निधन झाल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी येत असून भारत भिम यात्र या जाती तोड, जाती जोडे या अभियाना अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच भारत भिम यात्रा दि. 18 मार्च 2016 रोजी अहमदनगर शहरामध्ये दाखल होत असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी मा.अशोकराव गायकवाड यांच्या राहत्या घरी उपस्थित रहावे. तसेच पुढील दौऱ्यामध्ये मा.खासदार साहेब शिर्डी याठिकाणी पत्रकार परिषद घेणार असून सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आव्हान मा.जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे तसेच शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, तालुका अध्यक्ष विशाल कांबळे व युवक तालुका अध्यक्ष अविनाश भोसले यांनी केले आहे.










