पारनेर शहरातील संत तुकाराम बीज महोत्सवाचे उद्घाटन करताना गुणेशदादा पारनेरकर. समवेत नगराध्यक्षा सीमा औटी, महादेव महाराज काळे, सचिन महारा...
पारनेर शहरातील संत तुकाराम बीज महोत्सवाचे उद्घाटन करताना गुणेशदादा पारनेरकर. समवेत नगराध्यक्षा सीमा औटी, महादेव महाराज काळे, सचिन महाराज शेटे, सभापती नंदकुमार देशमुख, दत्तात्रय कुलट, किसन गंधाडे, स्वप्नील पुजारी, रमेश अडसूळ, धोंडिभाऊ पुजारी. पारनेर : पारनेर
शहरातील जगदगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्यावतीने भैरवनाथ मंदिरानजीक संत तुकाराम महाराज बीज सोहळय़ास सोमवारी भक्तिमय वातावरणात प्रांरभ झाला. सचिन महाराज शेटे हे आपल्या रसाळ वाणीतून संत तुकाराम महाराजांच्या जीवनकथाही यात सांगत आहेत.
पारनेर शहरात प्रथमच युवकांनी एकत्र येऊन जगदगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानची स्थापना केली असून सोमवारपासून संत तुकाराम बीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणार्या या महोत्सवाचे उद््घाटन पूर्णवाद परिवाराचे प्रमुख गुणेश पारनेरकर, नगराध्यक्षा सीमा औटी, महादेव महाराज काळे, सभापती नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, दत्तात्रय कुलट, गणपत अंबुले, नंदकुमार औटी, भैरवनाथ सेवा मंडळाचे प्रमुख धोंडिभाऊ पुजारी, मृदृंगमणी स्वप्नील महाराज पुजारी, रमेश अडसुळ, शिरीष शेटीया आदींच्या उपस्थितीत झाले.
यावेळी सचिन महाराज शेटे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वडिलांसह त्यावेळच्या संतांनीही देशसेवेत सहभाग घेतला होता, असे सांगितले. विविध देशभक्तीपर गितांनीही यावेळी रंगत आणली होती. संत तुकाराम महाराज यांच्या कुटुंबाची माहिती त्यांनी देऊन विविध अभंगातून त्यांची महती सांगितली. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.










