प्रतिनिधी - तालुक्यातील तादळी दुमाला येथील अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरूवातील...
प्रतिनिधी - तालुक्यातील तादळी दुमाला येथील अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने रविवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरूवातीला तिची प्रकृती गंभीर होती. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
या मुलीला सुरूवातीला श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तोफखाना पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून, रात्री उशिरापर्यंत तिचा कोणताही जबाब नोंदवला नसल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. पण, वरिष्ठांच्या आदेशानुसार मुलीचा जबाब लवकरच नोंदवला जाईल, असे मोरे यांनी सांगितले.
महिन्याभरापूर्वी या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेण्यात आले होते. तेथे तिच्यावर अत्याचार झाला. पीडित मुलीने श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा फिर्याद दिली. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहे. त्यासाठी मुलीचा जबाब बदलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांकडून होत आहे. स्थानिक संघटनांनी देखील हे प्रकार उचलून धरले आहे.
पोलिसांच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने रविवारी विषारी औषध घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांकडून होत आहे. मुलीचा जबाब बदलण्यासाठी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दोन वरिष्ठ अधिकारी दबाव आणत आहेत. मुलीला न्याय मिळून देण्याऐवजी अधिकारी आरोपींची बाजू घेत आहेत. त्यासाठी धमकावत आहेत. मुलीला जबाब घेण्याच्या नावाखाली बाजून घेऊन पोलीस तिच्यावर दबाव आणत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून पैसे देण्याचे प्रलोभन देखील दाखविण्यात आल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे.










