अहमदनगर - सरकारने नुकतीच जाहिर केलेल्या दुष्काळी यादीत अहमदनगर जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. परंतु ज्या तालुक्यातील ...
अहमदनगर - सरकारने नुकतीच जाहिर केलेल्या दुष्काळी यादीत अहमदनगर जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. परंतु ज्या तालुक्यातील टँकर मागणीसाठी 22 गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडले आहे त्या गावाचा मात्र या यादित समावेश नाही.
याविरोधात गुरुवारी पंचायत समिती सभापती संभाजीराव पालवे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच याविरोधात तीव्र आंदोलन करण्याची भूमिकाही शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या 4 वर्षापासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्यास पाणी नाही, पिके नाही, जनावरांना चारा नाही. हंडाभर पाण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही वणवण हिंडावे लागते सुमारे 70 हजार जनता टॅंकरचे पाणी पित आहे. सध्या तालुक्यात 45 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशी भयानक परिस्थिती असूनही सरकारने जाहिर केलेल्या यादीत पाथर्डी तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही.
याकारणाने पंचायत समितीचे सभापती संभाजीराव पालवे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. तालुका दुष्काळी जाहिर करावा, अन्यथा
तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर, विष्णुपंत पवार, माऊली केळगंद्रे, डॉ.राजेंद्र खेडेकर, कल्याण एकशिंगे आदि उपस्थित होते. प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या आश्वासनानंतर मोर्चेचे विसर्जन करण्यात आले.










