नगर- अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतीच्यावतीने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी आजपर्यंत विविध आंदोलने, धरणे, मोर्चे काढण्यात आले. त्या माध्यमात...
नगर- अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतीच्यावतीने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी आजपर्यंत विविध आंदोलने, धरणे, मोर्चे काढण्यात आले. त्या माध्यमातून बेकायदेशीर रिक्षांवर प्रशानासाने कारवाई करण्यात येत आहे, तेव्हा हा लढा कायमस्वरुपी ठेवण्यासाठी परवानाधारक रिक्षा चालकांनी एकजूट होणे महत्वाचे आहे. या रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करत असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी व्यक्त केले.
परवाना धारक रिक्षा चालकांचा मेळावा हमाल पंचायत येथे आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये सल्लागारपदी नियुत्या करण्यात आल्या यामध्ये ऍड.शिवाजीराव डमाळे, युवा नेते वैभव जगताप, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते शेख अर्शद, माजी परिवहन अधिकारी सय्यद शहानिजाम, माजी तहसिलदार विलासराव धोंडे यांचा समावेश असून, त्यांना जिल्हाध्यक्ष शंकराव घुले यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष आजिम सय्यद, शेखुभाई देशमुख, विजय शेलार, शाहु लंगोटे, लर्तिें शेख, अशोक औशिकर आदि उपस्थित होते.









