अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६ मार्च रोजी शिर्डीत हे राज्यस्...
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६ मार्च रोजी शिर्डीत हे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर होत आहे. मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांना एकत्रित करुन व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय झाला आहे.
यासंदर्भात औरंगाबाद येथे एक बैठकही झाली आहे. हिवाळी अधिवेशन काळात राज्यात एकाच दिवशी २५ हजार ठिकाणी आंदोलन करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे आरक्षण जनआंदोलनाचे निमंत्रक व शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी सांगितले.
शिबिरात मराठा आरक्षण इतिहास व आरक्षणाची गरज, मराठा आरक्षणाची वैधानिक वैधता व न्यायालयीन लढा आणि मराठा आरक्षण जनआंदोलन या विषयांवर प्रल्हादराव शितोळे, आरक्षण चळवळीतील नेते प्रवीण गायकवाड,आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे पाटील, संजीव भोर, संतोष गव्हाणे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात विविध संघटना सहभागी होणार आहेत.










