सारोळा आडवाईत घबराट : आठवड्यानंतरही आजाराचे निदान नाही शेतकरी संतप्त . सारोळा आडवाईत गाय व बैल दगावत असून त्यांच्या रक्तांचे नमु...
सारोळा आडवाईत घबराट : आठवड्यानंतरही आजाराचे निदान नाही
शेतकरी संतप्त
.
सारोळा आडवाईत गाय व बैल दगावत असून त्यांच्या रक्तांचे नमुने पुणे येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. तोपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे.अधिकारी,भाळवणी पारनेर : तालुक्यातील सारोळा आडवाई येथे अज्ञात आजाराने १२ जनावरे दगावली आहेत. गाय-बैलांना नेमका कोणता आजार झाला याचे निदान आठवडाभरानंतरही पशुवैद्यकीय अधिकार्यांना झालेले नाही. हा आजार आटोक्यात न आल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पारनेर-जामगाव मार्गावर जामगावपासून चार कि.मी. अंतरावरील सारोळा आडवाई गाव आहे. गावात मागील आठवड्यात फंडवस्तीवरील रावसाहेब फंड यांच्या एक बैल व एका गायीला ताप आल्याने उपचार करण्यात आले. मात्र ताप वाढल्यानंतर ही जनावरे खाली बसले आणि हंबरडा फोडून दगावले.
तापाने गायी दगावल्या असतील असा अंदाज घेऊन उपचार करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी उत्तम फंड यांच्या तीन जर्सी गायी, भिमाजी फंड, सुरेश फंड, विनोद फंड, बाळासाहेब अबुज, भागा मुरकुटे यांच्याही गायींचा आठवडाभराच्या कालावधीत दगावल्या. सगळीकडे एकच आजार असल्याचे लक्षात येताच माजी सरपंच देविदास अबुज, परशुराम फंड, डॉ.दत्तात्रय फंड यांच्यासह शेतकर्यांनी भाळवणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एस.व्ही.नांदे यांना माहिती दिल्यावर त्यांनी उपचार सुरू केले.
तसेच जनावरांना लसीकरणही केले. मात्र जनावरे दगावण्याचे प्रमाण सुरूच असल्याने गायीच्या रक्ताचे नमुने पुणे येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले. पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीत हे संकट उभे राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठवडा उलटुनही अज्ञात आजाराने गायी-बैल दगावण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने व पशुवैद्यकीय अधिकार्यांना आजाराने निदान न झाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या विरोधात सारोळा आडवाईचे ग्रामस्थ संतप्त झाले. गुरूवारी सकाळी सरपंच सविता फंड, उपसरपंच संजय महांडुळे, निलेश फंड,
माजी सरपंच डॉ.दत्तात्रय फंड यांच्यासह शेतकर्यांनी गावात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. गंभीर प्रकार होऊन शेतकर्यांचे नुकसान होत असताना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बी.के.राठोड यांच्यासह वरीष्ठ अधिकारी फिरकले नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यावेळी सारोळा आडवाईत भाळवणीचे पशुवैद्यकीय अधिकारी एस. व्ही. नांदे दाखल झाल्यावर शेतकर्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला.
दुपारी नाशिक विभागीय प्रयोगशाळेचे पशुसंवर्धन आयुक्त डी.के.चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बी.के.राठोड, सहाय्यक आयुक्त नानासाहेब कदम यांनी सारोळा आडवाईत गोठय़ातील गायी व बैलांची पाहणी केली. त्यांनी तातडीने जनावरांना कॅल्शियम व फॉस्फरसची मात्रा देणे सुरू करण्यास सांगितले.
त्यांनाही या आजाराचे निदान झाले नाही. अहवाल आल्यानंतरच आजाराचे निदान होईल, असे पशुसंवर्धन अधिकारी बी.के.राठोड यांनी सांगितले. अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयाच्या कर्मचारी आणि नवृत्तांना लकरच नवृत्तीवेतन देण्यात येईल. तर, माध्यमिक शाळांमधील ग्रंथपालाच्या वेतनश्रेणीचा प्रश्न देखील सोडवू, असे आश्वासन तावडे यांनी दिले.










