पिंपरी - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्थ गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा शासननिर्णय जाहिर झाला आहे. ...
पिंपरी - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्थ गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा शासननिर्णय जाहिर झाला आहे. या संदर्भात पारनेर तालुक्यातील ६० गावे ५० पैशापेक्षा कमी आनेवारीची म्हणजे दुष्काळग्रस्थ असून या गावातील विद्यार्थ्यांचे परिक्षाशुल्क परत मिळावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पारनेर तालुका अध्यक्ष प्रा. राजू पानमंद यांनी पारनेर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्याकडे केले आहे. गुरुवारी प्रा. पानमंद यांनी प्राचार्य आहेर यांची भेट घेउन दुष्काळग्रस्थ भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळवन्यासाठी सकारात्मक चर्चा केली.
पारनेर तालुक्यात सध्या सुमारे ६० गावांची आनेवारी ५० पैशंपेक्षा कमी आहे. जुन्या यादिनुसार विद्यापिठाकडे ३० गावे दुष्काळग्रस्थ असल्याची यादी आहे. परंतु सुधारित यादिनुसार जवळपास ६० गावे दुष्काळग्रस्थ आहेत. त्यामुळे सुधारित यादीनुसार उर्वरित ३० गावातील विद्यार्थी परीक्षा शुल्क परत मिळन्यापाासून वंचित राहिले आहेत. हे परीक्षा शुल्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून महाविद्यालायाकडे तातडीने परत मिळने गरजेचे असल्याचे प्रा. पानमंद म्हणाले. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा करणार आहे. तसेच ५० पैसे पेक्षा कमी आनेवारी असलेल्या गावांची सुधारित यादी विद्यालयाच्या सुचानाफलकावर लावण्याची मागणी यावेळी प्रा पानमंद यांनी केली आहे. यावेळी चर्चेदरम्यान प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर यांनी सकारात्मक चर्चा केली असल्याची पानमंद हे बोलले. तसेच ज्या दुष्काळग्रस्थ गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळन्याबाबत काही अडचणी असल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पारनेर शहर मंत्री महेश ठुबे व निघोज शहर मंत्री वैभव गाडिलकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष राजू पानमंद यांनी केले..










