श्रीगोंदा - येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शेख महंमद बाबा यांच्या यात्रोत्सवाला शनिव...
श्रीगोंदा - येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शेख महंमद बाबा यांच्या यात्रोत्सवाला शनिवारी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शेजारील प्रांगणात खेळणी, खाद्यपदार्थ विक्री, इमीटेशन ज्वेलरी यांच्या दुकानातही गर्दी होती. तर मनोरंजन साधने देखील सायंकाळी सुरु झाली होती.
यात्रा काळात अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपअधिक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक, शामकांत सोमवंशी लक्ष ठेऊन आहेत तर धडक कृती दल, दंगल नियंत्रक पथक, महिला पोलिस कर्मचारी व शेजारील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचीही मदत घेतली जात आहे.












