गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा शतक महोत्सव उत्साहात व भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होणार - आ.अरुण जगताप नगर - कै.वै.पं. गंगाधरशास्...
गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचा शतक महोत्सव उत्साहात व भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होणार -
आ.अरुण जगताप
आ.अरुण जगताप
नगर - कै.वै.पं. गंगाधरशास्त्री गुणे यांनी गरीबांना व गरजुंना दर्जेदार आयुर्वेद उपचार मिळावेत तसेच महाविद्यालयातून चांगले आय़र्वेद तज्ञ घडावेत, यासाठी स्थापन केलेल्या गुणे आयुर्वेद महाविद्यालया व रुग्णालयाचा 2017 साली शतक महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन सुरु असून, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत हा मेळावा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार प्रय़त्नशील आहेत. शतक महोत्सवानिमित्त अमूलाग्र बदल करण्यात आले आहे. संस्थेच्या इमारतीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून, विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतीगृहाचे अद्यायावत नुतनीकरण पूर्णत्वास येत आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग तळमळीने ज्ञानदान करुन आयुर्वेद तज्ञ घडवत आहेत. त्यामुळे निकालही चांगले लागत आहेत. राज्यात संस्थेचा नावलौकिक वाढत आहे, असे प्रतिपादन आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी केले.
गंगाधारशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे ‘अंतरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते गुणेशास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. यावेळी मंडळाचे सचिव डॉ.विजय भंडारी, संचालक ज्ञानदेव पांडूळे, ज्ञानेश्वर रासकर, वैशाली ससे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संगीता निंबाळकर, डॉ.प्रमिला नलगे, विद्यार्थी प्रतिनिधी राजेश खंडागळे, अजय चवरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.निलेश बकाल, डॉ.सरोज ठाकूर, डॉ.किरण जावळे, डॉ.नितीन जाधव, डॉ.अमित शिनगारे, डॉ.निलकंठ ठाकरे, माजी प्राचार्य डॉ.गणेश मगर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर होळकर आदिंसह महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ऑर्केस्ट्रा सादर केला.
यावेळी ज्ञानदेव पांडूळे म्हणाले, गुणे आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मनामध्ये देशाप्रती प्रेम बाळगुन प्रामाणिकपणे रुग्णसेवा करावी. रुग्णसेवा ही ईश्वरासमान असल्याने निष्ठेने हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे. यावेळी ज्ञानेश्वर रासकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या डॉ.संगीता निंबाळकर यांनी केले तर आभार डॉ.प्रज्वल ठाकूर यांनी मानले.
स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सय्यद अली, सोहेल पटेल, हेमंत शिंदे, मनोज भोये, किरण गायकवाड, ओमप्रकाश पाटील, अतुल कडू, सचिन कळमकर, अंकुश भोये, चैतन्य पालकर, वैभव गदादे आदिंनी परिश्रम घेतले.









