अहमदनगर पहिली मंडळी (काँग्री) अहमदनगर या धार्मिक संस्थेची स्थापना 1833 साली झाली. 183 वर्षाची गौरवशाली परंपरा या मंडळीला लाभलेली आहे. ...
अहमदनगर पहिली मंडळी (काँग्री) अहमदनगर या धार्मिक संस्थेची स्थापना 1833 साली झाली. 183 वर्षाची गौरवशाली परंपरा या मंडळीला लाभलेली आहे. अशा या माता मंडळीमध्ये अनेक देवाच्या सेवकांनी सेवा केलेली आहे.
वास्तविक पाहता सन 1984 साली अहमदनगर पहिली मंडळी (काँग्री) अहमदनगर या न्यास संस्थेची स्थापना धर्मदाय आयुक्त, अहमदनगर येथे झाली. या न्यास संस्थाचा पी.टी.आर.नं.डी-18 असून या संस्थेला मान्यता प्राप्त घटना व नियमावली नव्हती व नाही. गेली 40 वर्षामध्ये एकही बदल अर्ज दाखल झालेला नव्हता. कोणत्याही हिशोब पत्रके दाखल झालेली नव्हती. हा सर्व बेकायदेशीर कारभार लक्षात घेता. सहाय्यक धर्मदाय आय़ुक्त पुणे यांनी अहमदनगर पहिली मंडळी (काँग्री) अहमदनगर पी.टी.आर.नं.डी-18 या न्यास संस्थेचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 च्या कलम 47 अन्वये 5 विश्वस्थांनी नियुक्ती केली. जॉन्सन विल्यम शेक्सपिअर, नंद किशोर बाबुराव जाधव, रेव्ह.प्रदिप गोविंद मकासरे, सुनिल शाऊल सोनवणे, एन.बी.जाधव, भोसले विद्यासागर, फ्रॅन्कलीन शेक्सपिअर यांची रितसर नियुक्ती केली व अहमदनगर पहिली मंडळी (काँग्री) अहमदनगर या माता मंडळीचा सर्व कायदेशीर व धार्मिक कार्य़भाग सुरळीत कऱण्याचे अधिकार देण्यात आले.
त्याचप्रमाणे अहमदनगर चर्च कौन्सील पीटीआर नं. डी-5 या न्यास संस्थेवर देखील वरील विश्वस्तांची नेमणूक देखील वरील विश्वस्तांची नेमणूक अधिकृत करण्यात आली. अहमदनगर चर्च कौन्सिल व अहमदनगर पहिली मंडळी या अधिकृत न्यासाच्या विश्वस्त पदी अधिकृत विश्वस्तांची नोंद असून मंडळीतील फेरबदल करणे मंडळीच्या विकासासाठी काम करणे मंडळीचे कामकाज सुरळीत पाहण्यासाठी विविध समित्या नेमणे इ. अधिकार प्राप्त आहेत. तेव्हा जनरल अॅसॅम्बली अथवा इतर बेकायदेशीर व्यक्तींना मंडळईच्या व कौन्सिलच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नाही. अशी माहिती पत्रकार परिषदेत जॉन्सन शेक्सपिअर यांनी दिली.










