नगर - कोणताही मजुर असो जसा प्लंबर, सुतार यांना 2017 पासून लागू होणाऱ्या नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉन्सीलच्या स्कील कार्डशिवाय काम करता...
नगर - कोणताही मजुर असो जसा प्लंबर, सुतार यांना 2017 पासून लागू होणाऱ्या नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉन्सीलच्या स्कील कार्डशिवाय काम करता येणार नाही. एच.एस.डी.सी.च्या माध्यमातून प्लंबर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यास मार्केट यार्डातील द टेक हब मध्ये सुरुवात झाली असून नगर मधील प्लंबर (पाईप फिटींग-नळांचे) काम कराणारांची यांचा फायदा घावा.
18 वर्षापुढील सर्व प्लंबर्सना हे प्रमाणपत्र 500 रु. परिक्षा फी भरुन मिळेल. परिक्षा फी भरुन मिळेल. परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही फी परत मिळणार असल्याने हे प्रमाणपत्र मोफतच मिळणार आहे. बँक पासबुक, फोट आणि सध्या प्लंबीगचे काम करत असल्याच्या शिफारस पत्रांसह 23 मार्च पुर्वी प्लंबरनी अर्ज करावयाचेत.
मुद्रा कर्ज योजनेसह, सरकारच्या यापुढील योजनांच्या फायद्यासाठी मजुरी काम करणाऱ्या सर्वांनाच स्कील कार्ड प्रमाणपत्राची आवश्यकता यापुढे भासणार असल्याचे तातडीने (23 मार्च पुर्वी) द टेक हब, छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर, स्व.वि.संघ इमारत येथे संपर्क साधावा. मो.9595952417










