या गावामध्ये ठणठणीत कोरडा दुष्काळ पडला असल्या कारणानं शेतकरी वर्ग पूर्ण हवालदिल झाला आहे. शेतकरी कमालीचा आर्थिक संकटात सापडला असल्या...
या गावामध्ये ठणठणीत कोरडा दुष्काळ पडला असल्या कारणानं शेतकरी वर्ग पूर्ण हवालदिल झाला आहे. शेतकरी कमालीचा आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतकरी पुरता जमीन दस्त झाला आहे.
त्याच बरोबर वाड्यावसत्यावर पिण्यासाठी टँकर चालू करावेत. जनावरांच्या चारा संमधीत प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अश्या अनेक गंभीर विषयांवर ग्रामसभेत चर्चा झाली व या विषयाला ग्रामसभेची परवानगी ही मिळाली.
दुष्काळा मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जे नुकसानन झाले आहे त्याची भरपाई मिळावी ही सर्व शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे ग्रामसभेनंतर सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी परिसरात जाळ पोळ झालेल्या परिसराला भेटी दिल्या व पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया :- १) डाळिंब या पीकामुळे या भागातील शेतकरी सधन होतो मात्र या वर्षी दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय व तोळ्याप्रमाणे तेजीत भाव मिळणार डाळिंब हे पीक या वर्षी मात्र दुष्काळात अर्धवट अवस्थेत सापडल्यामुळे कवडीमोल भावात माल विकावा लागत आहे -
भाऊसाहेब शेटे (प्रगतशील शेतकरी) यांनीं दिली जीवाची कालवाकालव करणारी प्रतिक्रिया - या ग्रामसभेला सरपंच सुवर्णा पवार उपसरपंच गेनुभाऊ बोऱ्हाडे सर्व सदस्य सोसायटी चेअरमन रामचंद्र चौधरी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते त्याच बरोबर महसूल विभागाचे सर्कल कुलट कृषी विभागाचे बनकर मॅडम कामगार तलाठी दीपक गोरे ग्रामसेवक किशोर काळे महावितरण चे कुंवर हे ही उपस्थित होते.










