नगर - मा.आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवार्थ जिप्सी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय अरुणोदय करंडक समुह आ...
नगर - मा.आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवार्थ जिप्सी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय अरुणोदय करंडक समुह आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेस महाराष्ट्र राज्यातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, बीड, नांदेड, सोलापूर, करमळा, ठाणे, कल्याण, अकोला, सातारा, बारामती, पंढरपूर या ठिकाणाहून स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. सदर स्पर्धा दि. २२ व २३ मार्च 2016 रोजी माऊली सभागृह सावेडी अहमदनगर येथे सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. अशी माहिती जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान यांनी दिली.
स्पर्धेत सुमारे एक लाख रुपयांची रोख पारितोषिके ७ फुटी भव्य करंडक नृत्य क्षेत्रातील तज्ञ परिक्षक, उत्तम संयोजन हे वैशिष्ट्ये असून पारितोषिक वितरण दि. 23 मार्च 2016 मार्च रोजी होणाऱ्या या स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन उपाध्यक्ष सौ.रुपाली देशमुख, अनंत रिसे, राहुल भिंगारदिवे, प्रभंजन कनिंगध्वज यांनी केले आहे.










