श्रीगोंदा - एम.आय.एम.चे अध्यक्ष व आ.वारिस पठाण यांनी वंदे मातरम व भारत माता की जय म्हणण्याचा विरोध केल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा ये...
श्रीगोंदा - एम.आय.एम.चे अध्यक्ष व आ.वारिस पठाण यांनी वंदे मातरम व भारत माता की जय म्हणण्याचा विरोध केल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथील शनीमारुती चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने ओवेसी व पठाण या दोन्ही वादग्रस्त आमदार, खासदारांच्या वक्तव्याचा निषेध करुन दोहोंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अगर भारत मे रहेना होगा तो भारत माता की जय कहेनाही होगा. वंदे मातरम या नात्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी चौक दणाणून सोडला. यावेळी मनोहर पोटे, सतिष मरवे, दादाराम ढवाण, बाळासाहेब महाडीक, धनशाम शेलार, भाऊसाहेब गोरे, संजय आनंदकर, प्रकाश निंभोरे, युवराज कोथींबीरे, बापूसाहेब गोरे, भागचंद घोडके, नवनाथ कोथिंबीरे, बाबासाहेब भोस, मच्छिंद्र शिंदे आदिंसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.










