नगर - अहमदनगर येथील गजानन रामदास फरताडे या लष्करी जवानाचा दि. 9 मार्च रोजी जम्मू येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दि.1...
नगर - अहमदनगर येथील गजानन रामदास फरताडे या लष्करी जवानाचा दि. 9 मार्च रोजी जम्मू येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दि.11 रोजी त्यांचा मृतदेह नगरला रात्री उशीरा आणण्यात आला. त्यांचा अंत्यसंस्कार अ.नगर येथील अमरधाम येथे मध्यरात्री 12.15 वा. लष्करी इतमानाने करण्यात आले. यावेळी लष्करी अधिकारी व कर्मचारी यांनी मानवंदना दिली.
गजानन फरताडे हे आर्मित दफेदार या पोस्टरव नोकरीस होते. ते 37 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










