संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना...
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.
सात दिवसीय संत तुकाराम बीज कार्यक्रमाचे आयोजन नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात दि19 व दि २५ दरम्यान गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या कीर्तनकारनी पाणी वाचवा, स्वच्छता अभियान व बेटी बचाव या सारख्या सामाजिक विषयावर संदेश कीर्तनातून दिले.
आज तुकाराम बीज निमित्त काल्याचे कीर्तन ह.भ.प उद्धवजी महाराज नेवासेकर यांचे होते. कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद भाविकांना देण्यात आला. तर यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भाविकांना तुकाराम बीज च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी नेवासा शहरातील व परिसरातील भाविका मोठ्या संख्येने उपस्थित होते










