श्रीगोंदा - जागतीक महिला दिनानिमित्त लोणी व्यंकनाथ येथील जिजाई व लॉन्स मध्ये रुपाली नहाटा व प्रिया रायमोकर यांनी महिलांसाठी पाककला,...
श्रीगोंदा - जागतीक महिला दिनानिमित्त लोणी व्यंकनाथ येथील जिजाई व लॉन्स मध्ये रुपाली नहाटा व प्रिया रायमोकर यांनी महिलांसाठी पाककला, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच शाब्बास होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजेंद्र टाक यांनी सादर केला. यामध्येही महिलांसाठी विविध स्पर्धा, गाणी, खेळ सादर करुन महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांचे दर्शन दिले तर विविध रेसीपी द्वारे गृहिनींनी वाहवा मिळविली.
नाफार्डच्या अध्यक्षा संगीताताई खामकर यांनी महिलांना मार्गदर्शन करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नगरसेवक दादासाहेब औटी, भरत कुमार नहाटा, शेंडगे, लियाकत तांबोळी, संध्या जगताप, मनिषा नगरे, दिलीप काकडे आदींसह महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत. होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये छाया भागवत यांनी प्रथम बक्षिस पैठणी पटकावली तर दिपाली वैध या व्दितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरुन त्यांनी सोन्याची नथ मिळवली तर पाक कलेमध्ये प्रिया काकडे, शिंदे यांनी बक्षिसे पटकावले रांगोळी स्पर्धेत गोसावी व संगीता यांनी बाजी मारली तर मुलींसाठी ठेवण्यात आलेल्या स्पर्धेत अनुक्रमे फिजा शेख व सय्यद विजेत्या ठरल्या. रुपाली नहाटा व प्रिया रायमोकर यांनी तालुक्यात महिलांसठी एक वेगळी मेजवाणी दिल्याने महिला वर्गाचा आनंद ओसंडून वाहत होता.










