नगर- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या व शतक महोत्सव साजरा करणार्या हिंद सेवा मंडळाची झालेली निवडणुक महत्वाची होती. शतक महोत्सव साजरा कर...
नगर- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या व शतक महोत्सव साजरा करणार्या हिंद सेवा मंडळाची झालेली निवडणुक महत्वाची होती. शतक महोत्सव साजरा करण्याची संधी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाला मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतेही आरोप प्रत्यारोप न करता अत्यंत संयमाने प्रगती पॅनेलने ही निवडणुक लढवली. केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावरच प्रगती पॅनेलचे सर्व उमेदवार निवडणुकीस सामोरे गेले. हिंद सेवा मंडळाच्या सर्व सभासदांनी प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांना स्विकारुन मतदान केले. पॅनेलमधील सर्वांनी हिंद सेवा मंडळाच्या उज्वल भवितव्यासाठी चांगले काम केल्याने प्रगती पॅनेलला सर्व सभासदांनी मोठ्या फरकाने विजयी केले. त्यामुळे केलेल्या चांगल्या कामाची पावती बहुमताने मिळाली आहे, असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले.
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्यावतीने हिंद सेवा मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार खा.दिलीप गांधी यांनी केला. यावेळी हिंद सेवा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, सचिव सुनिल रामदासी, पॅनेलचे नेते ब्रिजलाल सारडा, अॅड.अनंत फडणवीस, संजय जोशी, अनिल देशपांडे, अजित बोरा, रोहिणी शिवलकर, डॉ.रमेश झरकर, डॉ.पारस कोठारी, सुमतीलाल कोठारी, मकरंद खेर, जगदीश झालानी, अशोक उपाध्ये, सुजित बेडेकर, मधुसूदन सारडा, अनंत भाटे आदिंचा सत्कार खा.गांधी यांनी केला. यावेळी अर्बन बँकेचे संचालक अनिल कोठारी, किशोर बोरा, नगरसेवक सुवेंद्र गांधी, अनंत देसाई आदि उपस्थित होते.










