नगर- ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे नगर शहर ऐतिहासिक शहर म्हणूनच ओळखले जात आहे. मात्र शहराचा विकास करुन शहराला नवे रुप देण्याचा प्रयत्न ...
नगर- ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे नगर शहर ऐतिहासिक शहर म्हणूनच ओळखले जात आहे. मात्र शहराचा विकास करुन शहराला नवे रुप देण्याचा प्रयत्न विविध योजनांच्या विकास कामांतून करत आहोत. खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सर्व बरोबर येवून शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी प्रसंगी राजकीय जोडे बाजुला ठेवू. नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी पाठपुरवठा करुन बीआरजीर्ऐं योजनेतून शहरातील महत्वाचा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजुरी मिळविली आहे. नगरसेविका मंगला गुंदेचा यांनीही प्रभागातील प्रश्ने आ.संग्राम जगताप व महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरवठा करुन मार्गी लावले आहेत, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे.
नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.20 मधील संगम चौक ते माणिकचौक या रस्त्याचे बीआरजीर्ऐं योजनेच्या माध्यमातून होणार्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर कळमकर यांच्या हस्ते व आ.संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगरसेविका मंगला गुंदेचा, माजी नगरसेवक अविनाश घुले, भाजपा शहर चिटणीस प्रशांत मुथा, अर्बन बँक संचालक किशोर बोरा, समीर बोरा, उमेश गिल्डा, प्रकाश मुथा, हिरेन भळगट, अशोक बोगावत, उमेश निस्ताने, जय मुनोत, गिरीष कोठारी, सुनिल गुगळे, अविनाश साकला, अभा बोगावत, कैलास निस्ताने, संजय कांगला, अमोल शिंगवी, प्रसन्न खाजगीवाले, सुनिल गुगळे, पोपट बोरा, पिंकी कबडे, चेतन गांधी, संजय ढोणे, अज्जू शेख, नाना जवरे आदिंसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










