नेवासा - शिवजयंती चे औचित्य साधून नेवासा शहर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाच्या मँरेथाँन स्पर्धेला शनिवारी (दि....
नेवासा - शिवजयंती चे औचित्य साधून नेवासा शहर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाच्या मँरेथाँन स्पर्धेला शनिवारी (दि.२६मार्च) रोजी उत्फुर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत शेकडो विध्यार्थी सहभागी झाले होते.
नेवासा येथील नगर पंचायत चौकापासून मॅरेथाँन स्पर्धेला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ झाला.या स्पर्धेचा शुभारंभ पोलिस निरीक्षक अनिल लंभाते मनसेचे तालुकाध्यक्ष विलासराव देशमुख,शहराध्यक्ष संतोष गव्हाणे,तालुका उपाध्यक्ष विजय नहार,दीपक परदेशी,अमोल कपिले,रमेश धोत्रे दिगंबर पवार,अनिल शिंगी,संदीप काळे,बापू जामदार,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.लहान गट व मोठा गट असे दोन गट ठेवण्यात आले होते.विजेत्या स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र शिल्प व् रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली.
यावेळी बदामबाई गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मृनालिनी मुळे,सुनीता कर्जुले,हेमा सुपेकर,मनसे महिला आघाडी प्रमुख सौ.अर्चना गव्हाणे यांचे सह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.










