श्रीगोंदा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सुड भावनेने अटक करुन 11 तास चौकशी केल्याप्रकऱणी श्...
श्रीगोंदा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सुड भावनेने अटक करुन 11 तास चौकशी केल्याप्रकऱणी श्रीगोंदा येथील शनिमारुती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले.
सरकारने फक्त त्यांनी अच्छे दिनचे स्वप्नच दाखवले मात्र प्रत्यक्षात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, जनावरांसाठी छावणी, पाणी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तर सरकारने घेतलेच नाही. या गोष्टींकडून जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी छगन भुजबळ यांच्यावर खोटे आरोप करुन सुडबुध्दीने 11 तास चौकशी करुन त्यांना अटकेत घेतले. याबद्दल हरिदास शिर्के यांनी निषेध व्यक्त केला. तसेच भुजबळांना तातडीने सोडून द्यावे अन्यथा तीव्र निषेध कऱण्याचाही इशारा त्यांनी दिला. तर दरेकर यांनी भुजबळांपाठोपाठ आता सुनिल तटकरे व अजित पवार यांना अटक करती की काय? अशी भीती व्यक्त केली. निवासी ना.तहसीलदार एस.एस.आल्हाट यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, उपनगराध्यक्ष अख्तर शेख, प्रा.तुकाराम दरेकर, ऋषीकेश गायकवाड, दादासाहेब औटी, राजु गोरे, कुमार लोखंडे, शरद कुदांडे, राजाभाऊ लोखंडे, बापूराव सिदनकर, दत्ता शिर्के, सागर वाकडे, भाऊ खतमाळस, संगीता खामकर, भुजबळ, शांताराम पोटे आदिंसह राष्ट्रवादीचे नगरसेवक यात सहभागी झाले होते.











