नगर - मनपा आरोग्य विभाग चांगले काम करीत असून, विशेषतः तोफखाना आरोग्य विभागाने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. झोपडपट्टी व गोरगर...
नगर - मनपा आरोग्य विभाग चांगले काम करीत असून, विशेषतः तोफखाना आरोग्य विभागाने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. झोपडपट्टी व गोरगरीबांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविली आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरात ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने शिबिरांचे आयोजन केले जाते असून, त्याचा रुग्णांना लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका मालनताई ढोणे यांनी केले.
मनपा आरोग्य विभागाच्या वतीने तोफखाना येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ढोणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक सचिन जाधव, डॉ. सुजाता साळवे, डॉ. सोनाली बांगर, डॉ. दीपाली पटारे, डॉ. नम्रता मकासरे, डॉ. दर्डा, डॉ. सुरेश घोलप, देवीदास सोनकांबळे, मंगल माटे, प्रतिमा राऊत, विकास गिते, सुडके, रंजना गायकवाड आदी उपस्थित होते.










