अहमदनगर - 6 व्या वेतन आय़ोगानुसार 2006 साली व तद्नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना रु.8560 इतके प्रारंभिक वेतन मिळत होते, मात्र 2005 साली...
अहमदनगर - 6 व्या वेतन आय़ोगानुसार 2006 साली व तद्नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना रु.8560 इतके प्रारंभिक वेतन मिळत होते, मात्र 2005 साली नियमित नियुक्ती मिळालेला ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना रु.8370 इतके प्रारंभिक वेतन मिळत होते. शिक्षक मंच व ऐक्य मंडळाने गेल्या ३ वर्षापासून अखंड पाठपुरावा करुन शासन निर्णय नियमित करुन हा प्रश्नाचा धसास लावला. आता या ज्येष्ठ शिक्षकांना १ फेब्रुवारी 2016 पासून सुधारित वेतन मिळणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथ.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे व जिल्हा उपसरचिटणीस शरद वांढेकर यांनी दिली.










