नगर- दि. 25, 26, 27 मार्च 2016 रोजी दिल्ली नोएडा येथे होणाऱ्या, इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व उत्तर प्रदेश ...
नगर- दि. 25, 26, 27 मार्च 2016 रोजी दिल्ली नोएडा येथे होणाऱ्या, इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व उत्तर प्रदेश बॉडी बिल्डिंग व फिटनेस असो.च्या सहकार्याने होणाऱ्या 56 व्या भारत श्री व 11 व्या मिस भारत श्री 2016 स्पर्धेसाठी अ.नगरचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड, राष्ट्रीय पंच प्राचार्य जयंत गिते, मनोज गायकवाड यांची महाराष्ट्र राज्यातर्फे पंच व प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.
भारत श्री ही स्पर्धा 10 वजनी गटात होणार असून, प्रत्येक गटात पहिल्या सहा क्रमांकास 30 हजार, 25 हजार, 20 हजार, 15 हजार, 10 हजार व 5 हजार रु. रोख, प्रमाणपत्र, आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयनला रोख 2 लाख रुपये, आकर्षक ट्रॉफी व मानाचा बेल्ट देऊन गौरवण्यात येणार आहे. बेस्ट पोझर व मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डरला रोख 25,000 रु., ट्रॉफी व मानाचा बेल्ट प्रदान करण्यात येणार आहे.
मिस भारत श्री दोन गटात 150 से.मी. खालील व 150 से.मी. वरील गटात होणार असून, पहिल्या सहा विजेतीस रोख रु.25 हजार रु.20 हजार, 15 हजार, 10 हजार, 7 हजार, 5 हजार रुपये आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र गौरवण्यात येणार आहे. चॅम्पियन र्ऑें चॅम्पियन ‘मिस भारत श्री 2016’ रोख 1 लाख रुपये, ट्रॉफी व बेल्ट प्रदान करण्यात येणार आहे.
वरील मान्यवरांच्या निवडीबद्दल अ.नगर डिस्ट्रिट बॉडी बिल्डिंगचे जिल्हाध्यक्ष महेशदादा सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमभाऊ भोगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अविनाश मोरे, राष्ट्रीय पंच अंकित गिते, मयुर गिते, नितीन पारखे, राज्य पंच शब्बीर अन्सार सय्यद यांनी अभिनंदन केले आहे.









