अहमदनगर - पुणे जिल्ह्यातील दौंड येथे असणाऱ्या सेंट मेरीच्या प्रतिमेचे व ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबलची विटंबना काही समाजकंटकांनी केली ...
अहमदनगर - पुणे जिल्ह्यातील दौंड येथे असणाऱ्या सेंट मेरीच्या प्रतिमेचे व ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबलची विटंबना काही समाजकंटकांनी केली आहे. या घटनेला आठवडा उलटून गेला तरी त्या समाजकंटकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सदरच्या समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास आरपीआयच्या वतीने ख्रिश्चन समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.










