नगर -राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांचा 24 व्या वा स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी मेमोरियल फौंडेशन प्र...
नगर -राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांचा 24 व्या वा स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी मेमोरियल फौंडेशन प्रायोजित इंदोर येथील बाल कलाकार कु.अदिती कोठारी हीच्या भक्तीसंध्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 20 मार्च रोजी सायं. 7 वा. उज्वलनगर येथील जैन स्थानकसमोरील प्रांगणात करण्यात आले आहे. यावेळी दि. 18 व 19 रोजी घेण्यात आलेल्या भक्तीगित स्पर्धेचा बक्षिस समारंभ होणार आहे, अशी माहिती जैन सोशल फौंडेशनच्या सौ.सरोज कटारिया यांनी दिली.
तरी रसिकांनी या भक्तीसंध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सोशल फेडरेशन व शांतीकुमारजी मेमोरियल फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे.










