नगर- टिळकरोड येथील शनैश्वर प्रतिष्ठाण आणि नवीपेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरातील श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ यांच्या संयुक्त व...
नगर- टिळकरोड येथील शनैश्वर प्रतिष्ठाण आणि नवीपेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरातील श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने महाशिवरात्रीचे औचित्य साधुन हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता गाडळकर आणि सत्संग मंडळाचे प्रितम मुथ्या यांनी दिली.
टिळकरोड येथे दि.7 मार्च रोजी रात्री 8.30 ते 10.30 या वेळेत कार्यक्रम होणार असुन हनुमान चालिस पठणानंतर मंदिर पुजारी सत्यनारायण खंडेलवाल यांचे हस्ते महाआरती करण्यात येवुन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल या प्रसंगी भाविकांनी उपस्थित राहुन अध्यात्मिक संवर्धन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठाणचे संस्थापक गोरख पडोळे यांनी केले आहे.










