पारनेर : राळेगणसिद्धी येथे भैरवी प्रतिष्ठान व किक बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे येथील पिंपरी-चिंच...
पारनेर : राळेगणसिद्धी येथे भैरवी प्रतिष्ठान व किक बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे येथील पिंपरी-चिंचवडच्या इन्फोसिस संघाने विजेतेपद मिळवले.
राळेगणसिद्धी येथे भैरवी प्रतिष्ठान व किक बॉक्सिंग संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या स्पर्धेचे उद््घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भैरवी ग्रुपचे अध्यक्ष दशरथ बोरूडे, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू व स्पर्धा संयोजक जयदेव म्हमाणे यांच्या हस्ते झाले. खेळाडूंच्या विविध धाडसी कसरती व प्रात्यक्षिकांचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले. स्पर्धेत राज्यभरातून सुमारे २५ संघ दाखल झाले होते.
भैरवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ बोरूडे यांनी राळेगणसिद्धीत पुढील वर्षी राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेण्याची विनंती जयदेव म्हमाणे यांना केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.










