महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र वारकरी संघटना व काशीविश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरजा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्...
महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र वारकरी संघटना व काशीविश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरजा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे होत्या.
तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे, डॉ.सुधा कांकरीया, भरतकुमार नहाटा, अजय रंधवे, बाळासाहेब हराळ, भास्करराव वागसकर, अनंत होंडे, गुलाबभाई तांबोळी, रिया कुटेल आदींना यावेळी सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेनेचे राजेंद्र दळवी घनश्याम, शेलार, बाबासाहेब भोस, बापूसाहेब गोरे, ऋषीकेश गायकवाड, हेमंत ओगले, प्रकाश निंभे, सुवर्णाताई पाचपुते, हेमंत नलगे, आदींसह परिसरातील नागरीक ग्रामस्थ उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोन्याबापू वाणी, बाबा महाराज होंडे, पांडूरंग व्यवहारे, ज्ञानदेव व अजिनाथ ढोरजकर, जालींदर व्यवहारे, अनिल टकले, अंबादास वाळके, सागर थोरात, मारुती मेटे, अमोल कोहळ, दादा ढोरजकर आदींनी परिश्रम घेतले.
तालुका कृषिअधिकारी विश्वनाथ दारकुंडे यांचा सन्मान करताना सेनेचे राजेंद्र दळवी, घनशाम शेलार, भरत कुमार नहाटा, ट्रस्टचे अध्यक्ष सोन्याबापू वाणी, बाबा महाराज शेंडे आदि दिसत आहेत. या देवस्थानचा क वर्गात समावेश झाला असून विकासासाठी 25 लाख रुपये मिळाले असल्याचे सोन्याबापू वाणी यांनी सांगितले.










