नगर - कुठल्याही देशाची भिस्त ही आजच्या तरुणांवर उभी असते. समाजकारणच काय पण राजकारणातही आजच्या तरुणांना डावलून कोणताही पक्ष पुढे जाऊ...
नगर - कुठल्याही देशाची भिस्त ही आजच्या तरुणांवर उभी असते. समाजकारणच काय पण राजकारणातही आजच्या तरुणांना डावलून कोणताही पक्ष पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तरुणांसाठी काम करतांना नेहमीच समाजकारणाची भूमिका ठेवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. तरुणांच्या हक्कसाठी नेहमीच विद्यार्थी सेना पुढे असते. विद्यार्थी सेनेचा कामाचा धसका घेऊन आज शहरातील विविध राजकारणी, लोकप्रतिनिधी महाविद्यालयांत लक्ष घालतांना दिसतात. त्यामुळेच विद्यार्थी सेनेत तरुण प्रवेश करीत आहेत, असे मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित म्हणाले.
मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील उदय वारुळे, विशाल बडे, प्रशांत नीळ, कानिफनाथ सकुंडे, दीपक नीळ, अभिजीत वाघ, राहुल घुगे, सुनील गायकवाड, अभिजीत गायकवाड, सागर कराड, राजू भोसले, पशांत काळे, प्रतीक काळे, योगेश चिपाडे, शुभम मरकड, विशाल कुलट आदी तरुणांनी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी सेना परेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.










