नगर - चांगल्या कामाला जाताना भगवान बाबांचा आशिर्वाद घ्यायचाच हा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा संदेश महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी राज्यात 111...
नगर - चांगल्या कामाला जाताना भगवान बाबांचा आशिर्वाद घ्यायचाच हा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा संदेश महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी राज्यात 111 भगवान बाबांची मंदिरे बांधण्याचा संकल्प जय भगवान महासंघाने केला असून, आतापर्यंत 38 मंदिरांचे काम सुरु झाले असून, आज (दि. 8) पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगर तालुयातील शहापूर येथे 39 व्या मंदिर भुमिपूजनाचा शुभारंभ झाला. एक वर्षभरातच हे काम पूर्ण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले.
शहापूर येथे भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज यांच्या मंदिर भुमिपूजनाचा शुभारंभ श्री. सानप यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या शुभारंभास प्रमुख अतिथी म्हणून हभप रामगिरी महाराज, हभप दत्त दिगंबर महाराज, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, उद्योजक बाबूशेठ नागरगोजे, सरपंच सुधीर पोटे, सरपंच प्रकाश पालवे, संदिप ढाकणे, सदाशिव थोरे, श्याम बडे, प्रदीप घोडके, बाबा सानप आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.









