Archive Pages Design$type=blogging

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती राहुरी तालूक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती भारतासह राहुरी तालूक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात व शांततेत साज...



विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती भारतासह राहुरी तालूक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवात सर्व आंबेडकर, फूले, शाहू चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
14 एप्रिल रोजी राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथून सकाळी 10 वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. तर मुख्य रस्त्यावरून रॅली काढून राजवाडा येथील समाज मंदिरात धम्म वंदना करून गोटूंबे आखाडा येथे रॅलीचा शेवट करून त्या ठिकाणी बुद्ग विहारचे भूमीपूजन करण्यात आले. शहरातील व तालूक्यातील विविध संघटनेच्या माध्यमातून काम करणार्या भिम अनूयायांनी जवळपास 200 मोटरसायकलीसह रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी जयंतीचे शतकोतर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती उत्सवा दरम्यान 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता 125 तोफांची सलामी देऊन 14 एप्रिल रोजी शहरात सांस्कृतिक, समाज प्रबोधनपर कार्यक्रम व अंध अपंगांना 125 काठ्या व ब्लॅकेटचे वाटप तसेच 125 रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. सकाळी 8 वाजता नागपूर दिक्षाभूमी तेथून आणलेल्या भिमज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. 9 वाजता धम्म वंदना व प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सायंकाळी 4 वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदना करून शहरातील मुख्य रस्त्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणूकी दरम्यान शहरातील विविध संघटनांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीचे स्वागत केले. 
यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विलास(नाना) साळवे, उपाध्यक्ष पदी गौतम विष्णू साळवे, दिपक आनंदा साळवे, प्रकाश राजू साळवे, किरण बाबूराव साळवे, राजेंद्र चिमाजी साळवे, नविन अन्तोन साळवे, दिपक रामजी साळवे, सुनिल रावसाहेब साळवे, सचिन दौलत साळवे, सुभाष भिमराव साळवे, अरूण मोहन साळवे, विशाल बाबासाहेब जाधव, अरूण शामराव साळवे, सुशिल भिमसेन साळवे, दादू बाबूराव साळवे, बबन जिजाबापू साळवे, दशरथ श्रावण साळवे, दिपक भाऊसाहेब साळवे, धनंजय जिजाबापू साळवे, उत्तम साळवे, सुनिल कसबे, कैलास छाटू साळवे, अशोक बळीद, राजू शामराव साळवे, गौतम सयाजी साळवे, सुधाकर जोसेफ साळवे, नितीन दौलत साळवे, बबलू हिवाळे, मनोज पाटोळे, अविनाश पडघलमल, शंकर बनसोडे, प्रशांत कसबे, भूषण साळवे तर गवई गटाचे उत्तम साळवे, एस. डी. पंडीत, दत्तात्रय वाघ, संतोष शिंदे, राजू साळवे, हर्षद साळवे, विशाल साळवे, संतोष जगधने, अरूण बुर्हाडे, अंकूश साळवे, आकाश साळवे, राजू बर्डे, बाळू रगडे, विशाल जाधव, वसंत जगधने आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती राहुरी तालूक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती राहुरी तालूक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmsTNbgSQK6HCHSH7OFvlaIrENdeWEhHUSLV1qeLn5DQp68SVQYeTDw4XkT_jRU6cvtLP1-qoC818AE4EslOaiQlXOMCUIgB3EAEeoi3xBk8obNGA-Adaz9R2Qy7zwcUDjFrz3BtId_Blg/s320/679.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhmsTNbgSQK6HCHSH7OFvlaIrENdeWEhHUSLV1qeLn5DQp68SVQYeTDw4XkT_jRU6cvtLP1-qoC818AE4EslOaiQlXOMCUIgB3EAEeoi3xBk8obNGA-Adaz9R2Qy7zwcUDjFrz3BtId_Blg/s72-c/679.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/125.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/04/125.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago