नगर - साई कॉलनी हा परिसर पूर्वी प्रभाग 13मध्ये नव्हता. नव्याने प्रभाग रचना झाल्यानंतर या परिसराचा प्रभाग 13मध्ये समावेश झाला. या प्रभ...
नगर - साई कॉलनी हा परिसर पूर्वी प्रभाग 13मध्ये नव्हता. नव्याने प्रभाग रचना झाल्यानंतर या परिसराचा प्रभाग 13मध्ये समावेश झाला. या प्रभागाचे नगरसेवक अनिल बोरुडे यांनी स्वतः लगेचच या भागाची पाहणी करून प्रश्न जाणून घेतले व विकासकामांच्या माध्यमतून ते सोडविण्याचे कामही सुरू केले. पूर्वी या परिसरात काहीच कामे झालेली नव्हती.आता कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे प्रभाग 13 आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, असे प्रतिपादन डॉ. दिलीप पाटणकर यांनी केले.
अ.नगर मनपा प्रभाग 13मधील साई कॉलनीत नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आलेल्या पेव्हींग ब्लॉकचा लोकार्पण सोहळा व हायमॅक्सचे उद्घाटन डॉ. दिलीप पाटणकर व राजेश्वरी पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पाटणकर बोलत होते. याप्रसंगी पुष्पा बोरुडे, अनुराधा देशपांडे, चेतन भळगट, अनिता कोटस्थाने, दीपक कातकडे, वसंत देशपांडे, प्रदीप कोटस्थाने, डॉ. एस. के. आहेर, संभाजी काळे, भीमाजी दहातोंडे, विमल ढेरे, सुभद्रा काळे, मंगल कातकडे, नानकराम लालवाणी, मनीषा लालवाणी, सारिका लालवाणी, सुरेखा भागवत, जालिंदर म्हसे, साईनाथ काकड, कारभारी पठारे, दिनकर देशमुख, निवृत्ती लांडे आदी उपस्थित होते.









