नगर - भगवान महावीर जयंतीनिमित्त कापड बाजार येथील गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी आदर्श व्यापारी मित्र मंडळ व शांतीकुमार मेमोरियल फौंडेशन ...
नगर - भगवान महावीर जयंतीनिमित्त कापड बाजार येथील गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी आदर्श व्यापारी मित्र मंडळ व शांतीकुमार मेमोरियल फौंडेशन आयोजित भगवान महावीर चषक सकल जैन जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स.9 वा. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याची माहिती मर्चंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय चोपडा यांनी दिली.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी व अ.ए. सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विकी मुथा, संदिप बोरा, शिवा भंडारी, राजेंद्र चोपडा, सागर गांधी, हेमेंद्र कासवा, नरेंद्र र्बोंना, चेतन बोगावत, राजेश भंडारी, शरद मेहेर, संपत मुथियान, सी.ए. प्रविण कटारिया, महावीर बडजाते, प्रमोद कासट, ललित गुंदेचा, मुळचंद सोमाणी, मनिष सोमानी, गिरीष आगरवाल व योगेश मुनोत उपस्थित राहणार आहेत.










