नगर - नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेहेकरी केंद्र (ता. नगर) विद्यार्थिनी कु. सिद्धी सुधीर जावळे ह...
नगर - नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेहेकरी केंद्र (ता. नगर) विद्यार्थिनी कु. सिद्धी सुधीर जावळे हिने प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सिद्धी राज्यात 16वी, तसेच केंद्रात 3 री आली आहे. सिद्धीला तिच्या पालकांचे, तसेच केंद्रप्रमुख शिंदे, शिक्षिका श्रीमती पगारे, श्रीमती कोष्टी व सौ. मेरगू मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून, सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.










