नगर- मखदुम एज्युकेशन ऍण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने उर्दू भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी नेहमी काही ना काही कार्यक्रमांचे व साहित्यिक उप...
नगर- मखदुम एज्युकेशन ऍण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने उर्दू भाषेच्या प्रसार व प्रचारासाठी नेहमी काही ना काही कार्यक्रमांचे व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांना उर्दू भाषेची भरपुर आवड आहे. पण वाचता येत नाही, अशा लोकांचा विचार करुन सोसायटीच्यावतीने उन्हाळी सुट्यामध्ये दि. 16 एप्रिल ते 16 मे 2016 पर्यंत (स.8 ते 10) या एक महिन्यामध्ये उर्दू वाचन करता यावे या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल, जेणे करुन विद्यार्थ्यांना व पालकांनाही उर्दू वाचता येईलच.
तरी उर्दू भाषा वाचन शिकण्यास इच्छूक असणार्यांनी 14 एप्रिल 2016 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक असून, नावनोंदणीसाठी मो.9225518518 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले आहे.










