नगर - विठ्ठल-रुमिणी मंदिराच्या 18 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्...
नगर - विठ्ठल-रुमिणी मंदिराच्या 18 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सभामंडपाचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व नगरसेविका रुपाली वारे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहे. या सभामंडपाचा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी चांगला उपयोग होऊ शकेल. सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यामुळे समाजात धार्मिकता वाढीस लागण्यास मोठी मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले.
प्रभाग 2, पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकातील संदेशनगर विठ्ठल-रुमिणी मंदिर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ महिला अनिता गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर अभिषेक कळमकर बोलत होते. यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेविका रुपाली वारे, प्रकाश भागानगरे, निखील वारे, संपत बारस्कर, बाळासाहेब पवार, अभिजीत खोसे, मुजाहिद कुरेशी, गडकर, खराडे, निमसे, भोपे, आंधळे, आघाव, रवी तांदळे, नाईकवाडी, गणेश गोरे, लेंडकर सर, अनिता गोरे, नाकोडे उपस्थित होते.










