बँकेने दि. 31 मार्च 2016 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केली असून सदर वर्षात बँकेची एकूण उलाढाल 94 हजार कोटीची झालेली आहे...
बँकेने दि. 31 मार्च 2016 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केली असून सदर वर्षात बँकेची एकूण उलाढाल 94 हजार कोटीची झालेली आहे. यामुळेच सन 2013-14 साठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असो. यांचा उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेचे ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून ज्येष्ठ नागरीकांना अर्धा टक्का जास्त व वय वर्ष 70 च्यु पुढे असल्यास १ टक्का जास्त तसेच ट्रस्ट, शैक्षिणक संस्थांना 367 दिवसांच्या मुदतीवर 8.75 टक्के व्याज देण्यात येते.
व्यापारी, लघुउद्योजक व सर्वसमान्य ग्राहकांना आजपर्यंत 52,784.12 लाख कर्जवाटप करण्यात आले आहे. ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजदर देऊन व कर्जदारांना कमीत कमी व्याजाची आकारणी करुन बँक 18.81 कोटी येवढी नफ्यात आहे. तसेच कर्जदारांना व्याजामध्ये 1092 लाखाचा भरघोस रिबेट बँकेने दिलेला आहे. त्यामुळे निव्वळ नफ्यात 18.75 टक्क्यांनी वाढ झाली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर निव्वळ नफा कमावणारी अहमदनगर मर्चंट बँक जिल्ह्यातील एकमेव बँक असावी. बँकेच्या एन.पी.ए. करण्याची प्रभावशाली वसूली होण्याकरीता बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणात एन.पी.ए.ची वसुली केलेली आहे. त्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना 40.20 लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी 2014 पासून कोअर बँकींगप्रमाणे लागू करण्यात आली आहे. बँकेच्या जिल्ह्याभरात 13 शाखा असूनही बँकेने दरवर्षी प्रगतीची नवनवीन शिखरे प्रादाक्रांत केलेली आहे.










