नगर- गेल्या अनेक वर्षांपासून मानवतावादी दृष्टीकोनातून शहर व उपनगरात विविध ठिकाणी निघणारे नाग, साप व इतर सरपटणारे प्राणी पकडण्याचा ...
नगर- गेल्या अनेक वर्षांपासून मानवतावादी दृष्टीकोनातून शहर व उपनगरात विविध ठिकाणी निघणारे नाग, साप व इतर सरपटणारे प्राणी पकडण्याचा छंद व त्यांना काही दिवसांनंतर निसर्गमुक्त करणे हे अॅड. हर्षद कटारिया, भावेश परमार, चारुदत्त जगताप, विनित चंदनापुरकर, सचिन उगले यांनी हा उपक्रम चालू ठेवलेला असून, मागील दोन महिन्यात नागरिकांकडून मिळालेली मानधनाची रु. 21 हजारांची रक्कम प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशन या संस्थेस देणगी दाखल देण्यात आली. नाम फौंडेशन शेतकर्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबांसाठी, दुष्काळाने पिडीत असलेल्या जनतेसाठी त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणासाठी अतिशय चांगले उल्लेखनिय कार्य करत आहे.










