नगर- निरंकारी मंडळाचे भूतपुर्व सद्गुरु युग प्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या 36 व्या स्मृती दिनानिमित्त मिस्किन रोड जॉगि...
नगर- निरंकारी मंडळाचे भूतपुर्व सद्गुरु युग प्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या 36 व्या स्मृती दिनानिमित्त मिस्किन रोड जॉगिंग पार्क समोरील निरंकारी सत्संग भवन येथे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत प.पू. अशोकलाल आहुजा (पुणे निवासी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संग प्रवचनांचा कार्यक्रम होईल. हाहा कार्यक्रम संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखेतर्फे येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
विश्वबंधुत्व, वैश्विक शांतीच्या प्रसारार्थ तसेच सत्य, प्रेम, सहिष्णुतेचा संदेश देत आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मानव एकता व मानव कल्याणासाठी समर्पित करणारे व याच उदात ध्येयांची पूर्ती करीत असतांना बाबा गुरबचन सिंह जी ना आपल्या प्राणांचेही बलिदान द्यावे लागले होते. त्यांच्या महान जीवन व कार्यामधून प्रेरणा घेण्यासाठी निरंकारी मिशनच्या वतीने 24 एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणून देशभर व विदेशातही विशेष सत्संग समारोहांचे आयेाजन करुन त्यांना श्रद्धा सुमन अर्पित केली जातात. शिवाय या दिवशी अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन ही केले जाते.
तरी भाविकांनी सत्संग प्रवचनांचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती मंडळाचे झोनल इंजार्च हरीशजी खुबचंदानी यांनी केली आहे.









