श्रीगोंदा - राष्ट्रपिता ज्योतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने बहुजन जोडो ग्रुप तथा लोकाधिकार सहाय्य ...
श्रीगोंदा - राष्ट्रपिता ज्योतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने बहुजन जोडो ग्रुप तथा लोकाधिकार सहाय्य संस्था दौड यांच्या वतीने गणेश हॉल, ज्युनिअर रेल्वे इन्स्टिट्यूट दौंड येथे बहुजन प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन दै. पुढारीचे यवतचे प्रतिनिधी एम. जी. शेलार यांच्या हस्ते झाले यावेळी बहुजनांचा सत्यनायकचे संपादक प्रा. विक्रम कांबळे, चंदन घोडके, राहुल चव्हाण, रफीक इनामदार, अतुल आखाडे आदिंसह बहुजन समाज बांधव उपस्थितत होते.
यावेळी प्रा. विक्रम कांबळे यांनी फुले-आंबेडकरी चळवळीत प्रसार माध्यमांची भूमिका याबाबत बोलतांना आजचा युवा वर्ग हा माध्यमांचा गुलाम झालेला दिसून येतो. याचाच परिणाम 2014 साली देशात सत्तांतर झाले माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभाकडून फुले-आंबेडकर चळवळीची आंदोलनाची नेहमीच उपेक्षा झालेली दिसून येत असल्याचे रोख ठोक सांगितले बहुजनांचे विचार स्पष्टपणे जगासमोर मांडण्यासाठी हक्काचे पत्र अथवा एखादे न्यूज चॅनल असायलाच हवे असे झाले तरच आपली भूमिका स्पष्ट निर्भिडपणे सर्वांसमोर मांडता येईल त्याला सेन्सॉर लागणार नाही युवा पिढीला महापुरुषांचा खरा इतिहास माहित असणे गरजेचे आहे. भारतातील 108 बहुजन महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जाती तोडून समाज जोडण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून बहुजन चळवळीत योगदान देणारे एल.एस.एस.न्यूज 24 चे प्रतिनिधी व पत्रकार संघाचे अध्यक्ष शकीलभाई शेख यांचाही यावेळी गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी पुढारीचे एम. जी. शेलार, प्रा. विक्रम कांबळे, चंदन घोडके, राहुल चव्हाण, रफिक इनामदार, नजीर शिकलगार आदि उपस्थित होते.










