नगर- केंद्र सरकारने सर्रों व्यवसायिकांवर लावलेल्या अबकरी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायिकांनी 1 मार्च पासून देशव्याप...
नगर- केंद्र सरकारने सर्रों व्यवसायिकांवर लावलेल्या अबकरी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायिकांनी 1 मार्च पासून देशव्यापी संप पुकारला होता. मात्र सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने दि. 13 एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशनची राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठक नगरमध्ये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केंद्र सरकारने अद्यापही अबकरी कायद्याबाबत कोणतेही तडजोड केली
नसल्याने सोमवार दि. 25 एप्रिल पासून पुन्हा तीन दिवसाचा राष्ट्रीय बंद सराफ सुवर्णकार व्यवसायीक करणार असून, 25 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये संपूर्ण भारतातील सर्रों व्यवसायिकांचा महामोर्चा संसदेवर धडकणार असल्याची माहिती फत्तेचंद रांका यांनी या बैठकीत दिली.या राज्य फेडरेशनच्या बैठकीस फेडरेशनचे सचिव सुधाकर टाक, प्रेम धावड, उपाध्यक्ष सचिन आंबीलवादे, खजिनदार श्री.सोळंकी, मराठवाडा अध्यक्ष गणेश बेद्रे, श्री.कट्टेकर आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगर जिल्ह्याच्यावतीने फत्तेचंद रांका याचा व पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रास्तविकात बोलताना फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष मुथा म्हणाले, केंद्र सरकारने लादलेल्या या अकबरी कायद्यामुळे सराफ व्यवसायिक मोट्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. 42 दिवस संप पुकारुनही सरकारला अद्याप जाग आलेली नाही. या 42 दिवसांच्या संपाने कोट्यावधी रुपयांचे महसुल उत्पन्नाचे नुकसान सरकारचे झाले आहे. त्यामुळे आतातरी सरकारने निर्णय घेऊन सराफ सुवर्णकार व्यवसायिकांच्या संपाची दखल घेऊन आम्हास न्याय द्यावा.









