नगर- दिडशे वर्षापेक्षा जास्त प्राचिन अशा नव्याने जिर्णोद्धार झालेल्या श्री आदेश्वर जैन मंदिराची प्रतिष्ठा बुधवार दि. 27 रोजी मोठ्या उत्सा...

नगर- दिडशे वर्षापेक्षा जास्त प्राचिन अशा नव्याने जिर्णोद्धार झालेल्या श्री आदेश्वर जैन मंदिराची प्रतिष्ठा बुधवार दि. 27 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. अति प्राचिन अशा श्री आदेश्वर भगवान यांच्या मुख्य प्रतिमेसह आणि नूतन श्री वासुपुज्य स्वामी भगवान यांच्या प्रतिमेसह 60 जिन प्रतिमांची आज प्रतिष्ठा होतेय. मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सर्व जैन बांधवांना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
17 एप्रिल पासून मंदिराचा 12 दिवसांचा प्रतिष्ठा महोत्सव पुज्य आचार्य श्री जगवल्लभसुरीजी, पुज्य आचार्य हर्षवल्लभसुरीजी, पुज्य पंन्यास जिर्णोद्धाराचे प्रेरक दर्शनवल्लभजीआणि सर्व साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रतिष्ठा महोत्सव संपन्न होत आहे.
मंदिराचे विश्वस्त सुभाष मुथा, चंपालाल मुथा, बाळासाहेब भंडारी, विनोदभाई शहा, मणिकांत भाटे, लालचंद कासवा, राजुभाई शाह, दिनेश गांधी यांच्यासह सर्व समाज बांधव प्रतिष्ठा महोत्सवासाठी गेली तीन महिने परिश्रम घेत होते.
बुधवारी त्या प्रतिष्ठेचा योग आला असून, सकाळी साडेआठ वाजता मुख्य प्रतिष्ठा संपन्न होईल आणि 28 तारखेला मंदिराचा उद्घाटन समारंभ होईल, अशी माहिती श्री.सुभाष मुथा यांनी दिली.









