राहुरी - तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे माहेरून 30 हजार रूपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहीत तरूणीचा छळ करून तीला जाळून मारल्याच...
राहुरी - तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे माहेरून 30 हजार रूपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहीत तरूणीचा छळ करून तीला जाळून मारल्याची घटना घडली, याबाबत राहुरी पोलिसांत तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर, जयश्री बंटी पवार वय 25 वर्षे राहणार देवळाली प्रवरा या विवाहीत तरूणीने संडास बाथरूम बांधण्यासाठी माहेरून 30 हजार रूपये आणावेत म्हणून शामा रावसाहेब पवार, बंटी रावसाहेब पवार व मारूती गणपत कांबळे सर्व राहणार देवळाली प्रवरा या तिघांनी जयश्री हिचा गेल्या सहा महीन्यापासून शारीरिक व मानसीक छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत्त केले. जयश्री ही पेटल्याने ती पूर्णपणे भाजली होती. दोनतीन दिवस नगर येथील सरकारी रूग्णालयात मृत्यूशी झूंज देऊन अखेर 31 मार्च 2016 रोजी जयश्री हीने आपला प्राण सोडला. जयश्री यावेळी सहा महीन्याची गरोदर होती. जयश्रीची आई मंगल पावलस घूगे वय 55 वर्षे राहणार शिवकृपा चाळ, घाटकोपर जि. ठाणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्हा रजि. नंबर 119/2016 भादंवि कलम 304 (ब), 498 (अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उप निरीक्षक महाविर जाधव हे करीत असून डिवायएसपी राकेश ओला यांनी जयश्रीच्या माहेर च्या लोकांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शुल्लक रकमेसाठी घरातीलच महीलेचा अशा प्रकारे शारीरिक व मानसीक छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत्त करणे, ही घटना म्हणजे मानूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची तालूक्यात मोठी चर्चा सुरू असून या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहे.










